भुसावळात कोम्बिंग ऑपरेशनमध्‍ये चार आरोपी जाळ्‍यात


 
भुसावळ प्रतिनिधी । भुसावळ शहरात बाजारपेठ पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन राबवित असतांना चार आरोपींना अटक करण्यात यश आले आहे. चारही आरोपी वेगवेगळ्या गुन्ह्यातील आरोपी होते.

पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, अप्‍पर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके,  उपविभागीय पोलीस अधिकारी गजाजन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, सहाय्‍यक पोलीस निरीक्षक संदिप परदेशी, पोहेकाॅ वाल्मिक सोनवणे, पोना.आत्माराम भालेराव, चंद्रकांत बोदडे, रविंद्र बिहा-डे, रमण सुरळकर, महेश चौधरी, विकास सातदिवे, दिनेश कापडणे, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी मपोकाॅ. स्वाती सोळुंकी यांनी आज दि.२८ रोजी शहरात ठिकठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन केले.यात ३ हद्दपार  व १ अटक वाॅरंटचा आरोपी जाळ्‍यात अडकला.

  बाजारपेठ पोलीसांनी  २८ फेब्रुवारी रोजी पहाटे १-३० वाजता दोन वर्ष करीता हद्दपार असलेला आरोपी शम्मी प्रल्हाद चावरीया( वय ३०) रा.अण्णाभाऊ साठे नगर  हा बेकायदेशीररित्या शहरात प्रवेश करुन घरी मिळाल्याने त्याचे विरुद्ध भाग ६, गुरन ००६७/२०२० महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १४२प्रमाणे गुन्हा दाखल करुन अटक करण्‍यात आली आहे.  तर पहाटे २-१० वाजता एक वर्ष करीता हद्दपार असलेला आरोपी बंटी परशुराम पथरोड (वय३३)व त्‍याचा भाऊ विष्णू परशुराम पथरोड(वय२२)दोन्‍ही रा.वाल्मिक नगर  हे सुध्‍दा बेकायदेशीररित्या घरी मिळुन आले.या दोघांना पोलीस घरून ताब्यात घेवुन पोलीस स्टेशनला घेऊन जात असताना त्यांनी शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्‍हणुन त्यांचे विरुद्ध  गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्‍यात आली आहे. तसेच भुसावळ न्यायालया कडील अटक वाॅरंट क्र.एससीसी ५९४/२०१८ मधील आरोपी शेख आरीफ शेख इसा रा.जाममोहल्ला यास सुध्‍दा घरी जावुन अटक करण्यात आली आहे.

Protected Content