डाक कार्यालयात सोमवारी डाक अदालतीचे आयोजन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील पांडे चौकात असलेल्या डाक कार्यालयात सोमवारी ३० जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती डाकघ्ज्ञर अधिक्षक बी.व्ही.चव्हाण यांनी शुक्रवारी २७ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

पोस्टाच्या कामासंबंधीच्या ज्या तक्रारींचे सहा आठवड्यांच्या आत निराकरण झाले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नाही. अशा तक्रारींच्या निराकरणासाठी पांडे चौकातील डाक कार्यालयात डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या अदालतीत टपाल वस्तु, मनीऑर्डर, बचत बॅंक खाते प्रमाणपत्र या संदर्भातील तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशिलासह करावा. संबंधितानी डाक सेवेबाबतची आपली तक्रार दोन प्रतीत ‘अधिक्षक डाकघर कार्यालय, पांडे चौक, जळगाव यांच्या नावे अतिरिक्त प्रती सह सोमवारी 30 जानेवारीपर्यंत अथवा तत्पूर्वी पोहचेल, अशा बेताने पाठवावी. तदनंतर आलेल्या तक्रारींवर कारवाई केली जाईल, परंतु त्यांचा डाक अदालत अंतर्गत विचार केला जाणार नाही. असेही डाकघर अधिक्षक बी.व्ही.चव्हाण यांनी शुक्रवारी २७ जानेवारी रोजी दुपारी ३ वाता दिलेल्या प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

Protected Content