Home क्राईम प्रेम नगरातून एकाची दुचाकी लांबविली

प्रेम नगरातून एकाची दुचाकी लांबविली

0
50


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील प्रेम नगरातून एकाची १५ हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, विशाल नंदकिशोर जगताप (वय-३९) रा. राम अपार्टमेंट, प्रेम नगर, पिंप्राळा जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतात. २५ जून रोजी रात्री १० वाजता त्यांनी त्यांच्या मालकीची (एमएच १९ बीएन ७२७) क्रमांकाची दुचाकी घरासमोर पार्क करून लावली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी पार्क केलेली दुचाकी चोरून नेल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. दुचाकी चोरीला गेल्यानंतर त्यांनी परिसरात सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकी मिळून न आली नाही. अखेर शुक्रवार १ जुलै रोजी सायंकाळी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 


Protected Content

Play sound