वृध्दाला मारहाण करून सोन्याची अंगठी लांबविली

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  शहरातील श्रीराम मार्केटजवळील एका दुकानावर वयोवृध्दाला काठीने मारहाण करून २७ हजार रूपये किंमतीची सोन्याची अंगठी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

जामनेर पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, रामसिंग जवारसिंग राठोड (वय-७५) रा. डोहरीतांडा ता.जामनेर जि.जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. रामिंसग राठोड हे जामनेर येथील आठवडे बाजारात गुरूवारी २३ मार्च रोजी आले होते. शहरातील श्रीराम मार्केटजवळील एका दुकानावर खरेदी करत असतांना एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्या हातातील काठी हिसकावून मारहाण केली व रामसिंग राठोड यांच्या हातातील सोन्याची अंगठी जबरी हिसकावून चोरून नेली. हा प्रकार घडल्यानंतर शनिवारी २५ मार्च रोजी जामनेर पोलीस ठाण्यात धााव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून दुपारी ३ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ जयेंद्र पगारे करीत आहे.

Protected Content