पॅन इंडिया अंतर्गत कायदेविषयक जनजागृती रॅलीचे आयोजन

जळगाव, प्रतिनिधी | पॅन इंडिया अंतर्गत स्वतंत्र्याचा अमृत महोत्सव, गांधी जयंती व विधी सेवा दिवसानिमित्त जनजागृती मोहिम अंतर्गत  रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीचा समारोप गांधी उद्यानात करण्यात आला.

 

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, भारत सरकार व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांचे निर्देशानुसार तसेच अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या आदेशान्वये  महात्मा गांधी जयंती, स्वतंत्र्याचा अमृत महोत्सव व विधी सेवा दिवसानिमित्त दि २  ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर २०२१ दरम्यान पॅन इंडिया आऊटरिच प्रोग्रामचे (भारतभर जनजागृती मोहिम) रॅलीने उद्घाटन करण्यात आले. रॅलीची सुरवात जिल्हा व सत्र न्यायालय करण्यात आली. या रॅलीचा  समारोप गांधी उद्यानात करण्यात आला. याप्रसंगी प्रभारी जिल्हा व सत्र न्यायाधीश  डी. ए. देशपांडे, जिल्हा सत्र न्यायाधीश  एस.जी.ठुबे, आर. एन.हिवसे,डी. ए. काळे, व्हि. बी.बोहरा, दिवाणी न्यायाधीश वंदना जोशी,  एस. पी.सय्यद, जे. बी. पवार, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव ए.ए.के.शेख, जिल्हा सरकारी वकील केतन ढाके,   महापौर जयश्री सुनील महाजन,जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष व सचिव,एस.एस.मणियार लाँ कॉलेज व गोदावरी लाँ कॉलेजचे प्राचार्य,शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.

 

 

 

Protected Content