Home Cities जळगाव बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त वंचीततर्फे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त वंचीततर्फे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

0
70


जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी  | वंचीत बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब तथा प्रकाशजी आंबेडकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज शहरात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत.

 

वंचीत बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब तथा प्रकाशजी आंबेडकर यांच्या  वाढदिवसानिमित्त आज सकाळी साडे नऊ वाजता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. यावेळी अधिष्ठाता जयप्रकाश रामानंद, जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे, युवा जिल्हाध्यक्ष जितेंद्र केदार, आक्कासाहेब पाटील, जिल्हा महासचिव वैभव शिरतुरे, महानगर अध्यक्ष दादा भाऊ राठोड, प्रसिद्धी प्रमुख राहुल सुरवाडे, युवा महासचिव ललित घोगले, डिगंबर सोनवणे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच काव्य रत्नावली चौकात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. तसेच सायंकाळी ६ वाजता प्रबोधनपर भीम गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे यांनी सागितले आहे.

 


Protected Content

Play sound