अनधिकृत बांधकाम कारवाईत सरकारने भेद करु नये – आशिष शेलार

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – राज्य सरकार मुंबईत अनधिकृत बांधकामावर आडनाव पाहून कारवाई करत आहे.  जाती आणि धर्मभेद सरकारने करु नये, असे भाजपचे नेते आशिष शेलार यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

महाविकास आघाडी सरकारचे पोलीस हनुमान भक्तांना, हनुमान चालिसा म्हणणाऱ्यांना पकडून कारवाई करीत आहे. तर त्यांचे निवासस्थान बांधकाम अनधिकृत ठरवत कारवाई करीत आहे. तर  दुसरीकडे गेल्या २५ वर्षात नागपाडा, मोहम्मद अली रोड, शेजारी असलेल्या बेहरामपाडा परिसरात कारवाई केली नाही,  दिल्ली महापालिकेकडून शाहीन बाग आणि जहांगीरपुरीत बुलडोझर चालवले जात आहे.  सोबतच मुंबईत  दाऊदच्या हस्तकांवर कारवाई करीत आहे. हा फरक राष्ट्रवादी, हिंदुत्ववादी सरकारच्या कामकाजात असल्याची टीका भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केली आहे.

मुंबईत गेल्या २५ वर्षात खान, पठाण, शेख यांनी अनधिकृत बांधकाम केलेले नाही. बेहरामपाडा दिसत नाही पण शाहीन बागवर कारवाई केल्यावर आरडाओरड केली जाते. नागपाडा, मोहम्मद अली रोड, बेहरामपाडा परिसरात बुलडोझर नेला नाही.  राणेचा बंगला दिसतो, राणे, राणा, कंबोज, राणावत यांना महापालिका बंगला तोडण्यासाठी नोटीस पाठवते. मात्र त्याचवेळी शेख, पठाण दिसत नाहीत.  ते अनधिकृत नाहीत का? आम्ही कोणाच्या विरोधात नाही पण अनधिकृत बांधकामावरील कारवाई आडनाव पाहून राज्य सरकारकडून कारवाया केल्या जात असल्याचा आरोप आशिष शेलार यांनी केला असून सरकारने असा भेद करु नये असेही शेलार म्हणाले आहेत.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!