मू.जे.महाविद्यालयात राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

mj college jalgaon

जळगाव, प्रतिनिधी | येथील मूळजी जेठा महाविद्यालय येथे ‘रिसेंट ट्रेंड्स इन बायोसायन्स एन्ड एनविरोनमेंटल सायन्स’ या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद आयोजन करण्यात आले आहे. महाविद्यालयाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त  महाविद्यालयाचे वनस्पतिशास्त्र, प्राणीशास्त्र विभाग आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठ, यांच्या संयुक्त विद्यमाने  परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

मू.जे.महाविद्यालयात राष्ट्रीय परिषद गुरुवार व शुक्रवार दि. १६ व १७ जानेवारी रोजी  होणार असून या परिषदेमध्ये वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र तसेच पर्यावरणशास्त्र क्षेत्राचा विविध घडामोडींवर सविस्तर चर्चा केली जाणार आहे.  परिषदेत प्रा. डॉ. डी. ए. पाटील, डॉ. आशिष टिपले, प्रा. डॉ. राजीव महाजन,  प्रा. डॉ. ए. जी. इंगळे,  प्रा. डॉ. एस. आर. थोरात यांची मार्गदर्शनपर व्याख्याने होणार आहेत. या परिषदेसाठी सुमारे २०० संशोधकांनी सहभाग  नोंदविलेला आहे.  परिषदेचे उद्घाटन गुरुवार, दि. १६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता डॉ. प्रदीप देशमुख(पुणे) यांच्या हस्ते होणार आहे तर प्रमुख पाहुणे म्हणून प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पी. पी. माहुलीकर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी के. सी. ई. चे सदस्य प्रा. डॉ. एल. ए. पाटील असणार आहेत. परिषदेचा समारोप शुक्रवार, दि. १७ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता होणार असून याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. व्ही. एल. माहेश्वरी, व  अध्यक्षस्थानी प्रा. पूनम मानुधने  हे असणार आहेत.  यावेळी उत्कृष्ट शोधनिबंध सादरीकरण करणाऱ्यांसाठी रोख रकमेची पारितोषिके दिली जाणार आहेत. तसेच महाविद्यालयातील पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांसाठी बायोजीकल रांगोळी स्पर्धा बुधवार, दि. १५ जानेवारी रोजी सकाळी  ११ वाजता महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीतील गोवर्धन दास यांच्या पुतळ्यासमोरील दालनात घेण्यात येणार असून या स्पर्धेच्या विजेत्यांना  दि. १७ जानेवारी रोजी बक्षिसे दिली जाणार आहेत.

Protected Content