शरद पवार हे महाराष्ट्राचे जाणता राजेच; उदयनराजेंना आव्हाडांचे प्रत्युत्तर

jitendra awhad

मुंबई प्रतिनिधी । शरद पवार हे महाराष्ट्राचे जाणता राजेच आहेत, असे म्हणत राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उदयनराजेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. एवढेच नाही तर शरद पवारांना जाणते राजे अशी उपाधी का दिली जाते? याचेही जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

होय, शरद पवार म्हणजे जाणता राजाच, हाताच्या तळव्यावरती महाराष्ट्राची ओळख असणारा एकमेव अद्वितीय म्हणजेच शरद पवार. इथला पाणीप्रश्न, इथला शेतीचा प्रश्न, औद्योगिक वसाहतींचा प्रश्न, नागरी वस्तीमधील प्रश्न, ग्रामीण अर्थव्यवस्थेचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतमजुरांचे प्रश्न अशी प्रश्नांची मालिका सांगा, महाराष्ट्रातील प्रत्येक प्रश्नांच उत्तर शरद पवारांकडे आहे, म्हणून त्यांना जाणता राजा म्हणतात. म्हणून काहीजण सांगतात की, त्यांचीच करंगळी धरून आम्ही राजकारणात आलो. जसे अनेकजण त्यांच्या करंगळीचा वापर करून राजकारणात आलेले आहेत. तसे अनेकजण त्यांच्यावर टीका करून हेडलाइनमध्ये आलेले आहेत. तेव्हा होय ते जाणते राजेच आहेत, तो जाणता राजाच आहे. अगोदर महिलांना ३० टक्के आरक्षण नंतर महिलांना ५० टक्के आरक्षण, मराठवाडा विद्यापीठास आंबेडकरांच नामकरण करणे, कोकण रेल्वे, जेएनपीटी असे अनेक प्रकल्प आहेत. महाराष्ट्राच्या गेल्या ६० वर्षांच्या सर्वांगीण विकासात सर्वाधिक वाटा जर कुणाचा असेल तर तो शरद पवार यांचाच आहे. होय म्हणूनच ते जाणते राजे आहेत. असे जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले आहे. ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरुन सुरु असणाऱ्या टीकेला उत्तर देताना उदयनराजेंनी आज पुण्यात पत्रकारपरिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली आहे.

Protected Content