कर्णधार विराट कोहलीने केला अनोखा विक्रम

virat kohli

पुणे प्रतिनिधी । भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा 50 कसोटी सामन्यांमध्ये कर्णधार पद सांभाळणारा दुसरा भारतीय कर्णधार ठरला आहे. आज (दि.10) पुण्याच्या मैदानावर टॉससाठी पोहोचताच विराट कोहलीने हा नवा रेकॉर्ड आपल्या नावे केला. कोहलीपूर्वी फक्त माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनेच 50 पेक्षा जास्त कसोटी सामन्यांमध्ये कर्णधार पद सांभाळलं आहे.

क्रिकेट विश्वातील रनमशीन असलेला विराट कोहली विविध विक्रमांना गवसणी घालत आहे. विराटने कसोटी क्रिकेटमध्येही एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. कर्णधार म्हणून कोहलीने आतापर्यंत ५० कसोटी सामन्यांचे नेतृत्व केले आहे. तो जगातील १४ वा आणि दुसरा भारतीय कर्णधार ठरला आहे. या कसोटीआधी विराट भारतीय कर्णधारांच्या यादीत सौरव गांगुलीसह संयुक्तरित्या दुसऱ्या स्थानावर होता. ४९ कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करणारा सौरव गांगुली तिसऱ्या स्थानावर आहे. महेंद्रसिंग धोनीने २००८-२०१४ या कालावधीत ६० कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. तो सर्वाधिक कसोटी सामन्यांत संघाचे नेतृत्व करणारा पहिला भारतीय कर्णधार आहे.

Protected Content