नावांचा सस्पेन्स संपला : शिंदेंच्या चिन्हाची उत्सुकता

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांच्या नावांना निवडणूक आयोगाने मान्यता दिल्याने याबाबतचा सस्पेन्स संपला आहे.

मागील काही दिवसांपासून उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटात निवडणूक चिन्ह आणि पक्षाच्या नावावरून रस्सीखेच सुरू होती. आज अखेर निवडणूक आयोगानं ‘बाळासाहेबांची शिवसेना ‘ हे नाव शिंदे गटाला दिलं आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव दिलं आहे.

दुसरीकडे, निवडणूक आयोगानं निवडणूक चिन्हांबाबतही निर्णय दिला आहे. ‘धगधगती मशाल’ हे चिन्ह उद्धव ठाकरे गटाला दिलं आहे. पण शिंदे गटाचे तिन्ही चिन्हं निवडणूक आयोगानं अमान्य केली आहेत. पुन्हा नव्याने तीन चिन्हे सूचवा, असा आदेश निवडणूक आयोगानं दिली आहेत. शिंदे गटाने उद्या सकाळपर्यंत तीन चिन्हे निवडणूक आयोगाकडे सादर करायची आहेत.

Protected Content