खडसे महाविद्यालयात नेहरू युवा केंद्राचा स्वयंसेवक नोंदणी कार्यक्रम

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने तसेच नेहरू युवा केंद्र जळगाव यांच्या माध्यमातून स्वयंसेवक नोंदणी कार्यक्रम  संपन्न झाला.

 

भारत सरकारच्या खेळ व युवा मंत्रालयाच्या अंतर्गत नेहरू युवा केंद्र ही एक स्वायत्त संस्था असून राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रनिर्मितेसाठी देशभर जनजागृतीपर कार्यक्रमाची अंमलबजावणी करीत असते. जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर व  लेखपाल अजिंक्य गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा उद्योग केंद्र मुक्ताईनगरचे समन्वयक सागर चव्हाण तसेच नॅशनल युथ व्हॅलेंटियर दीपक खिरोडकर व निकिता मेढे यांनी विद्यार्थ्यांना उद्बोधन केले. यामध्ये स्टार्ट अप इंडिया, मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, आत्मनिर्भर भारत व युवक संघटन तसेच तालुका व जिल्हा पातळीवर क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धा त्याचबरोबर स्वच्छ भारत स्वस्थ भारत आणि फिट इंडिया अशा विविध महत्वकांक्षी योजनांचा व कार्यक्रमांचा माहितीपट विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवला. या संपूर्ण कार्यक्रमाचे मार्गदर्शन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. हेमंत महाजन, उपउप्राचार्य डॉ. अनिल पाटील, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. संजीव साळवे, प्रा. डॉ. प्रतिभा डाके ग्रंथालय अधीक्षक प्रा. नरेंद्र सरोदे यांनी केले, तर या कार्यक्रमाचे संयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ.दीपक बावस्कर, प्रा. डॉ. ताहिरा मीर व प्रा. विजय डांगे यांनी केले. या कार्यक्रमासाठी नेहा दैवे, स्नेहा बोराखेडे, कोमल माळी,आरती कोळी, नेहा वाणी, भाग्यश्री जयकर, सपना  बोदडे,निकिता दुटटे, दीप्ती पाटील, ललित लोंढे, जयेश पाटील, ऋषिकेश पाटील, प्रणव भोजने, तेजस सरोदे, कुणाल भारंबे,चंदन शिमरे, सुमेध तायडे, ऋत्विक पाटील, निखिल भगत, गौरव पाटील,सौरभ संबारे, प्रतीक वराडे, निखिल रायपुरे  शुभम गायकवाड,अरबाज तडवी  सौरभ गाजरे, सपना वंजारी, मोहन थेटे, कृष्णकांत पाटील, नरेंद्र सुतार  अक्षय पाटील, प्रशांत पाटील, सचिन सोनी, लोकेश महाजन, वैभव माळी, ज्ञानेश्वर शेळके, पवन पाटील, ज्ञानेश पाटील, राहुल होडबारे, विजय नापडे, कोमल खोडके, आकांक्षा कापसे,शिवानी शिंगोटे, अपर्णा कोळी, प्रेरणा कोळी व सुधीर इंगळे इत्यादी विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदविला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शितल भोई तर प्रास्ताविक भाग्यश्री बोरोले तर आभार प्रफुल यमनेरे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी व कर्मचारी वृंद बहुसंख्येने उपस्थित होता.

 

Protected Content