पातोंडा येथे प्रा.आ.केंद्राकडून जंतुनाशक दिवस साजरा

अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील पातोंडा प्राथमिक आरोग्य केंद्राकडून राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी केंद्र, श्री दत्त विद्या मंदिरातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त जंतनाशकच्या गोळ्या देऊन राष्ट्रीय जंतनाशक दिवस साजरा करण्यात आला.

 

जंतांच्या प्रादुर्भावामुळे बालकांमध्ये कुपोषण व रक्तक्षय होऊन थकवा जाणवणे,शारीरिक वाढ खुंटणे, मानसिक विकास न होणे आदी सारख्या समस्या उद्भवतात. विशेषतः ही लक्षणे १  ते १९  वर्ष वयाच्या मुलांमध्ये आढळून येत असतात म्हणून अंगणवाडी केंद्र ते प्राथमिक, माध्यमिक शाळेतील वय १  ते १९  वर्षे असलेल्या विद्यार्थ्यांना चघळून खाण्याच्या जंतानाशक गोळ्या दिल्या जातात. ह्या गोळ्यांमुळे बालके सदृढ होवून जंता रोगांपासून बचाव करतात.म्हणून दरवर्षी ह्या गोळ्यांचे वाटप करण्यात येत असते. दरम्यान, पातोंडा शेजारील नांद्री गावात देखील जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्या देतेवेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी वृंद,आशा स्वयंसेवीका,शाळेतील शिक्षकवृंद आदी उपस्थित होते.

 

Protected Content