यावल येथे आठवड्यातील तीन दिवस आरोग्य तपासणी शिबीर

यावल, प्रीतीनिधी । येथील शहरातील खाजगी वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टर्स यांच्या वतीने शहरातील विविध ठीकाणी नागरीकांची आरोग्य तपासणी होणार असुन आज शुक्रवारपासुन या आरोग्य तपासणी कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे .

मुख्याधिकारी बबन तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना संदर्भातील जनजागृती व रुग्णांच्या उपचारपद्धतीवर आयोजित बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आले. शहरातील नागरीकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात संदर्भात निर्णय घेण्यात येवुन आठवड्यातील तिन दिवस ही तपासणी करण्याचे ठरविण्यात आले. यात आठवड्यातील शुक्रवार सोमवार आणि बुधवार या दिवशी आरोग्य शिबीरे बोरावल गेट परिसर जिल्हा परिषद मराठी शाळा, बालसंस्कार विद्यामंदीर शाळा , आणी इंदीरा गांधी ऊर्दु गर्ल्स हायस्कुल चोपडा रोड या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे. या शिबीरात डॉ. तुषार फेगडे, डॉ .पी .एस .पाटील, डॉ. युवराज चौधरी, डॉ. प्रविण पाटील , डॉ. सतिष अस्वार आणि डॉ . श्रीकांत महाजन हे सर्व बोरावल गेट जिल्हा परिषद शाळा तर बालसंस्कार विद्यामंदीर शाळा येथे डॉ . मनोज वारके, डॉ. रमेश पाचपोळ, डॉ . योगेश गडे , डॉ . चंदन पाटील , डॉ . अभय रावते आणि इंदीरा गांधी ऊर्दु गर्ल्स हायस्कुल चोपडा रोड येथील शिबीरात डॉ. रिजवान खान , डॉ. शेख मुक्तार शेख मुसा व डॉ. शेख वसीम शेख हनिफ हे या शिबीराच्या माध्यमातुन नागरीकांची मोफत आरोग्य तपासणी करणार आहेत. या मोफत आरोग्य तपासणी शिबिराची सुरवात प्रांत अधिकारी डॉ. अजीत थोरबोले आणि तहसीलदार जितेन्द्र कुवर व नगर परिषदचे मुख्यधिकारी बबन तडवी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. याप्रसंगी यावलच्या प्रथम नागरीक नगराध्यक्ष श्रीमती नौशाद मुबारक तडवी, माजी नगराध्यक्ष व नगरसेवक अतुल पाटील आदी मान्यवर उपस्थितीत होते .नागरीकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी व शहरातील सर्व नागरीकांनी या शिबीरात आपल्या आरोग्याची मोफत तपासणी करून घ्यावी असे आवाहन प्रांत अधिकारी डॉ. अजीत थोरबोले यांनी केले आहे. आज शिबीराच्या पहील्या दिवशी सकाळी ११ते दुपारी २ वाजेपर्यंत संपन्न झालेल्या शिबीरात दोनशेहुन अधिक नागरीकांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली.

Protected Content