म्युनिसिपल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे बारावी परीक्षेमध्ये यश

फैजपूर, प्रतिनिधी । येथील म्युनिसिपल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा निकाल ९६.७२ %  लागलेला आहे.  या परीक्षेमध्ये विज्ञान व वाणिज्य शाखेचा निकाल १००% लागला.

म्युनिसिपल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजात विज्ञान शाखेत मोहित मनोज भावसार याने ८१.८४ टक्के मिळवत प्रथम क्रमांक पटकाविला आहे. द्वितीय क्रमांक खिलेश चंद्रशेखर तलेले ८०.९२ %, तृतीय क्रमांक निकिता प्रकाश तेली ८०.६१%. प्राप्त केले आहेत. कला शाखेचा निकाल ८४.६१ टक्के लागला. यात प्रथम क्रमांक किरण विजय चौधरी ६८.१५% व दुसरा क्रमांक प्रियंका युवराज गाढे ६५.५३3% व तिसरा क्रमांक स्वप्निल प्रकाश बोदडे ६४.७६%. असे यश प्राप्त केले. व वाणिज्य शाखेचा निकाल १००% लागला.यात प्रथम क्रमांक योगिता शशिकांत तायडे ६३.२९% ,द्वितीय क्रमांक दिक्षा दिलीप मेढे ६१.२३% व तृतीय क्रमांक खिलचंद बाळकृष्ण सोनवणे ६०.६१% तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांमधून यशवंत बाळू महाले ७७.५३% प्राप्त केले. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक आर. एल. आगळे, पर्यवेक्षक .एस.ओ.सराफ. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन व कौतुक केले.

Protected Content