न्यायालयात महिला वकीलावर चाकू हल्ला करणाऱ्याला कठोर शासन करा; यावल वकील संघाचे निवेदन

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । वर्धा येथील न्यायालयातील कोर्ट हॉलमध्ये न्यायाधिशांसमोर महिला वकील योगिता मुंन यांच्यावर चाकु हल्ला करुन जखमी करणाऱ्या आरोपी भीम गोविंद पाटील यास कडक शासन व्हावे, अशा मागणीचे निवेदन येथील तहसिलदार यांना यावल बार असोसीएशन, यावलतर्फे देण्यात आले आहे.

यावल बार असोसीएशन यांच्यातर्फे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही वकील हे कोर्टामध्ये पक्षकारांना न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र परिश्रम करत असतो व पक्षकारांना न्याय मिळवून देत असतो. सदर काम करीत असतांना आम्हास अनेकदा विरुध्द बाजुच्या पक्षकारांकडुन धमक्या मिळत असतात. अशा परिस्थितीत देखील आम्ही कोणतीही भिती न बाळगता आमचे व्यावसायीक कार्य करीत असतो.

परंतु दि.२३/०३/२०२२ रोजी वर्धा येथील न्यायालयातील कोर्ट हॉलमध्ये’न्यायाधिशांसमोर महिला वकील भगीनी योगिता मुंन यांच्यावर चाकु हल्ला करुन जखमी केल्याची घटना नुकतीच घडलेली आहे. त्यामुळे आम्ही वकील बांधवात एक भितीचे वातावरण तयार झालेले आहे. अशा प्रकारच्या घटना जर घडत असतील तर वकील बांधवांना योग्य प्रकारे काम करणे शक्य होणार नाही. व त्यांना नेहमी भितीचे वातावरणात काम करावे लागेल. त्यामुळे वकिलांना पक्षकारांना योग्यरित्या न्याय मिळवुन देण्याच्या कामात अडथळा निर्माण होऊन न्यायदानाचे कामकाज योग्यरित्या होऊ शकत नाही.

अशा परिस्थितीत दि. २२ मार्च रोजी वर्धा येथे वकीलावर झालेल्या हल्ल्यातील आरोपी नामे भिम गोविंद पाटील यास तात्काळ कडक शासन होणे आवश्यक असुन वकिलांच्या संरक्षणासाठी ॲडव्होकेट प्रोटेक्शन विलास तात्काळ मंजुरी मिळुन सदर कायद्यान्वये वकिलांना संरक्षण मिळणे आवश्यक आहे.

तरी सदर निवेदनाव्दारे यावल बार असोशिएशन, यावल, वर्धा येथील न्यायालयातील वकिलांवर झालेल्या चाकु हल्ला घटनेचा तिव्र निषेध करतो व आपणास कळवितो की, वर्धा येथे वकीलावर झालेल्या हल्यातील आरोपी नामे भिम गोविंद पाटील यास तात्काळ कडक शासन व्हावे व वकिलांच्या संरक्षणासाठी अॅडव्होकेट प्रोटेक्शन बिल तात्काळ मंजुर होवुन तसा कायदा लवकरात लवकर लागु करण्यात यावा. याबाबत आपणा मार्फत शासनास कळविण्यात यावे. असे निवेदनात म्हटले आहे.

यावेळी ॲड. राजेश गडे, ॲड. अशोक सुखकर, ॲड. के.डी. सोनवणे, ॲड. डि. आर. बाविस्कर, ॲड. जी.एम.बारी, ॲड. बडगुजर, ॲड. निवृत्ती पाटील, ॲड. एस.जी. कवडीवाले आणि ॲड. सुल्तान तडवी यांनी निवेदनावर सह्या केल्या आहेत.

यावल वकील संघाचे अध्यक्ष ॲड. धिरज चौधरी, सचिव ॲड. निलेश पी. मोरे, ॲड. राजेश गडे,  ॲड. अशोक सुरवळकर, ॲड. के. डी. सोनवणे, ॲड. डी. आर. बाविस्कर, ॲड. जी. एम. बारी, ॲड. राजेश बारी, ॲड. उमेश बडगुजर, ॲड. निवृत्ती पाटील, ॲड. एस. जी. कवडीवाले, ॲड. सुलताना तडवी, ॲड. संगीता तडवी, ॲड. विनोद परतणे, ॲड. दत्तात्रेय सावकारे, ॲड. शेख, ॲड. अजय कुलकर्णी, ॲड. याकुब तडवी, अॅड. स्वाती साठे, ॲड. गौरव पाटील, ॲड. नितीन चौधरी व इतर हजर होते.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!