Home क्राईम शिवाजी नगरातून तरूणाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबविली; शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

शिवाजी नगरातून तरूणाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबविली; शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

0
107
bike thieves 20180259850
bike thieves 20180259850


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील शिवाजीनगर परिसरातील मारुती मंदिराजवळून तरुणाची २० हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहर पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भूषण विजय सोनार (वय-३३) रा. राधारमण आपार्टमेंट, कानळदा रोड, जळगाव हे खासगी नोकरी करून आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यासाठी त्यांच्याकडे (एमएच १८ एव्ही ७४ क्रमांकाची दुचाकी असून या दुचाकीचा वापर दैनंदिन कामासाठी करतात. २७ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास भूषण सोनार हे शिवाजीनगरातील मारुती मंदिराजवळ दुचाकीने आले आले. कामाच्या निमित्ताने जायचे असल्यामुळे त्यांनी मारूती मंदिराजवळ दुचाकी पार्क करून बाहेर गेले. त्यानंतर काम आटोपून परत आल्यानंतर त्यांना दुचाकी जागेवर दिसून आली नाही. त्यांनी शोधाशोध करूनही कोठेही मिळाली नाही. १२ दिवसानंतर गुरुवार १० फेब्रुवारी रोजी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक गजानन बडगुजर करत आहे.


Protected Content

Play sound