जैन इरिगेशनमध्ये अग्निशमन दिवस साजरा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जैन इरिगेशनच्या सर्व आस्थापनांमध्ये १४ एप्रिल २०२३ रोजी अग्रीशमन सेवा दिन साजरा करण्यात आला. जैन फूड पार्क येथे अग्निशमन दिवस व सप्ताहाच्या निमित्ताने आग विझवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्य वापराबाबत प्रात्यक्षिकासह माहिती सादर केली जात आहे.

जैन इरिगेशनच्या सर्व आस्थापनांमध्ये १४ एप्रिल २०२३ रोजी अग्रीशमन सेवा दिन साजरा करण्यात आला. १४ एप्रिल १९४४ रोजी मुंबईच्या व्हिक्टोरीया डॉक पोर्ट ट्रस्ट येथे स्फोटक वाहून आणणाऱ्या जहाजाला आग लागली होती. ही आग प्रचंड अशी होती. ती विझविण्याचे कार्य सुरू होते. त्यावेळी मुंबई अग्नीशमन दलाचे ६६ जवान शहीद झाले होते. त्यांच्या स्मरणार्थ संपूर्ण देशात भारत सरकारच्या आदेशानुसार अग्निशमन सेवा दिन व अग्निशमन सेवा सप्ताह पाळण्यात येतो. जैन फूड पार्क येथे अग्निशमन दिवस व सप्ताहाच्या निमित्ताने आग विझवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्य वापराबाबत प्रात्यक्षिकासह माहिती सादर केली जात आहे.

त्याकाळी आग विझविण्यासाठी धारातीर्थी पडलेल्या शहीद अग्निशमन जवानांना कंपनीच्या सहकाऱ्यांनी आयोजित कार्यक्रमात श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी वरिष्ठ अधिकारी सुनील गुप्ता, जी.आर. पाटील, एस.बी. ठाकरे, वाय.जे. पाटील, फायर सेफ्टी विभागाचे सेफ्टी अधिकारी स्वप्निल चौधरी, अमोल पाटील, कैलास सैंदाणे, मनोज पाटील, प्रवीण पाटील, हेमकांत पाटील, सागर बागुल, गणेश मोरे, नितीन चौधरी, जितेंद्र पाटील, आशिष सुतार, महेंद्र पाटील, जे.जे. पाटील आदी सहकारी उपस्थित होते. या दिनाच्या औचित्याने आपल्या अवतीभवती ज्वलनशील पदार्थ असतील तर त्याच्या साठवणुकीचा, सुरक्षिततेचा आढावा व त्याबाबतचे अत्यावश्यक नियोजन करून ठेवावे जेणे करून कुठलाही अपघात अथवा अनिष्ठ घटना घडणार नाही याची काळजी घेण्याबाबत सांगण्यात आले. अपघात होऊ नयेत याबाबत घेतलेली खबरदारी या शहीद अग्निशमन जवानांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल.

Protected Content