विनाकारण घरा बाहेर फिरणाऱ्या वाहनधारकांवर पोलिसांनी केली कारवाई

भुसावळ, प्रतिनिधी । शहरासह ग्रामीण भागात ही कोरोनाने एन्ट्री केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात ठीक ठिकाणी नाकेबंदी करण्यात आलेली आहे . तरी देखील काही नागरिक विनाकारण घराबाहेर फिरत असल्याचे दिसून येत असल्‍याने त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे.

प्रशासनातर्फे वारंवर विनाकारण घराबाहेर पडू नये अशा सूचना दिल्या जात आहे. मात्र, काही नागरिक त्याला जुमानत नसल्याने उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामचंद्र कुंभार यांच्यासह सहकाऱ्यांनी विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई सुरू केली आहे. प्रशासनातर्फे नागरिकांना वारंवार घरात थांबण्याचे आवाहन केले जात आहे. तरीदेखील नागरिक प्रशासनाच्या नियमाची पायमल्ली करीत असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर फिरू नये प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन वारंवार प्रशासनातर्फे करण्यात येत आहे .

Protected Content