आभोणे तांडा येथे तहसिलदारांचे ई अॅप द्वारे मार्गदर्शन

चाळीसगाव, प्रतिनिधी  । तालुक्यातील आभोणे तांडा येथे तहसीलदार अमोल मोरे यांनी शेतकऱ्यांना ई पिकपाहणी अॅपद्वारे  मार्गदर्शन करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या स्तुत्य उपक्रमात सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले. 

राज्य सरकारने शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्याचे निराकरण करण्यासाठी ई पिकपाहणी अॅप लॉन्च केले आहे. या अॅपद्वारे शेतकऱ्यांना स्वतःलाच पिकपेरा नोंदविता येणार आहे. दरम्यान शेतकऱ्यांमध्ये या अॅपबद्दल जागृती नसल्याने तहसीलदार अमोल मोरे यांनी तालुक्यातील आभोणे तांडा गाठून ई पिकपाहणी अॅप वापरून पिकपाहणी करण्याचे फायदे व शासनाचे उदिष्ट समजावून सांगितले. त्याचबरोबर अमोल मोरे यांनी शेत शिवारात जाऊन प्रत्यक्षात शेतीची पाहणी करून प्रात्यक्षिक करून दाखविले. सदर प्रकल्पात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन मोरे यांनी यावेळी केले. तसेच तलाठी अनिल निकम व मंडळ अधिकारी सुधीर बच्छाव यांनी ई पिकपाहणी ऍपचे सर्व बारकावे समजावून दिलेत.  यावेळी ग्रा.सदस्य दयाराम राठोड, राहुल राठोड, रोहीदास राठोड, अमरसिंग राठोड, कांतिलाल राठोड, पंडित पवार, रामदास राठोड,गोरख राठोड, योगेश राठोड, सुरेश राठोड, रमेश राठोड, सुधीर राठोड, अतुल राठोड,दिपक राठोड, निखिल राठोड,आधी शेतकरी उपस्थित होते.

Protected Content