Home Cities अमळनेर हिंगोणे खु.प्र.ज. ग्रामपंचायतीतर्फे वृक्षारोपण मोहीम

हिंगोणे खु.प्र.ज. ग्रामपंचायतीतर्फे वृक्षारोपण मोहीम

0
110

अमळनेर प्रतिनिधी तालुक्यातील हिंगोणे खु.प्र.ज. ग्रामपंचायतीच्या वतीने बिहार पॅटर्न च्या माध्यमातून ६०० वृक्षांची लागवड करण्यात आली. जि.प.सदस्या जयश्री पाटील व सरपंच राजश्री पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षलागवड करण्यात आली.

दुष्काळाची दाहकता लक्षात घेता वृक्षारोपण चळवळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत आहे. यात ग्रामपंचायतीने देखील सहभाग घेतला आहे. यातून मजुरांना काही प्रमाणात रोजगार उपलब्द्ध होणार आहे. यावेळी माजी सरपंच प्रवीण दगाजी पाटील, ग्रामपंचायत सदस्य किरण कोळी, संजय प्रभाकर पाटील, प्रकाश शामराव कोळी, नथु नामदेव कोळी, बारकू बुधा कोळी, सुरेश रामसिंग कोळी, वासुदेव दगडू भिल, आधार आकसू भिल, पदम सजन बैसाने, सचिन आनंदा कोळी, छोटू कोळी, बबलू पाटील व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound