प्रवेशद्वाराचे काम तात्काळ करण्यासाठी युवा सेनेचे आंदोलन

अमळनेर प्रतिनिधी | शहरातील धुळे रोड वरील प्रवेशद्वाराचे काम तातडीने पूर्ण करावे या मागणीसाठी युवा सेनेतर्फे उपजिल्हाप्रमुख श्रीकांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

याबाबत वृत्त असे की, धुळे रोडवरील प्रवेशद्वाराचे काम रखडले असून यामुळे येथे अनेक अपघात होत आहेत. या पार्श्‍वभूमिवर अपघातास कारणीभूत ठरलेल्या व संथगतीने काम करणार्‍या ठेकेदारा विरुद्ध तातडीने काम पूर्ण करावे यासाठी युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख श्रीकांत पाटील यांनी आज आक्रमक पवित्रा घेत प्रवेशद्वारा जवळच रास्ता रोको आंदोलन केले.
शहरासाठी आकर्षण ठरणारे प्रवेशद्वार ठेकेदाट्रक्सच्या नियोजना अभावी मृत्यूद्वार ठरणार्‍या प्रवेशद्वारावर रिफलेक्टर न लावणे , वळण मार्गाचे फलक न लावणे , तात्पुरत्या स्वरूपात लावलेली कच्ची बॅरॅकेटिंग वारंवार तुटून जात असल्याने वाहनचालकांना प्रवेशद्वार जवळील अडथळे दिसत नसल्याने आजतागायत तब्बल ४० ते ५० अपघात झाले आहेत.

संबंधित ठेकेदाराने ४ ते ५ दिवसात काम पुर्ण न केल्यास त्यांची विलंबा बाबत सखोल चौकशी करावी व ठेकेदारावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा संबंधित ठेकेदारावर बांधकाम विभागाच्या कोणत्या अधिकारीची अवकृपा आहे व हेतुपुरस्कर दुर्लक्ष का करीत आहे याची चौकशी व्हावी अश्या मागणीसाठी युवा सेनेने शुक्रवारी आक्रमक पवित्रा घेत रास्ता रोको आंदोलन केले.

यावेळी युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख श्रीकांत पाटील, नगरसेवक प्रताप शिंपी ,उमेश अंधारे , अनंत निकम ,अमर पाटील यांनी घोषणा देत वाहतूक रोखली होती. सुमारे पाऊण तास वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.पोलीस उपनिरीक्षक गंभीर शिंदे ,पोलीस नाईक डॉ शरद पाटील, हेडकॉन्स्टेबल संजय पाटील ,यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. आंदोलनानंतर तहसीलदार ,पोलीस निरीक्षक, सार्वजनिक बांधकाम विभाग याना निवेदन दिले

Protected Content