Home Cities यावल जिल्हा बँकेच्या निवडणुकीत यावल सोसायटी मतदारसंघातुन अतुल पाटील यांची उमेदवारी

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत यावल सोसायटी मतदारसंघातुन अतुल पाटील यांची उमेदवारी

0
4

यावल- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या होवु घातलेल्या पंचवार्षिक संचालक मंडळाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी यावल सोसायटी मतदार संघातून माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक अतुल वसंतराव पाटील यांनी संचालकपदासाठी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

जळगाव जिल्हा बँकेचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे त्यांनी हा अर्ज सादर केला. त्यांच्या उमेदवारी अर्जास सूचक म्हणून विरावली येथील सतीश रघुनाथ पाटील तर अनुमोदक म्हणून कासवा येथील मीराबाई संजय सपकाळे हे आहेत.
अतुल पाटील यांचे नामांकन दाखल करतेवेळी यावल नगरीच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा छायाताई पाटील, राष्ट्रवादी काँग्रेचे ॲड. देवकांत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राकेश सोनार,गोलू माळी आदी प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

यावल सोसायटी मतदार संघातून अतुल पाटील यांच्या उमेदवारीमुळे जिल्हा बँक निवडणुकीत चुरस वाढणार असून,त्यांच्या उमेदवारी कडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.


Protected Content

Play sound