३१ डिसेंबरला संत गजानन महाराज मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले !

शेगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सध्या नाताळच्या सुट्या आणि नववर्षामुळे श्री क्षेत्र शेगाव येथे भाविकांची अलोट गर्दी उसळली असल्याने ३१ डिसेंबर रोजी रात्रभर मंदिर उघडे राहणार आहे.

नाताळाची सुट्टी चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागता निमित्त शेगावात श्रींच्या दर्शनासाठी होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता श्री संत गजानन महाराजांच्या समाधीचे मंदिर ३१ डिसेंबर रोजी दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवणार येणार असल्याची माहिती श्री गजानन महाराज संस्थानच्या वतीने देण्यात आली आहे. दरवर्षी क्रिसमसच्या सुट्ट्या चालू वर्षाचा निरोप व नवीन वर्षाचे स्वागत निमित्त श्रींच्या दर्शनासाठी शेगाव मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात.

येणार्‍या भाविकांना श्रींच्या समाधीच्या दर्शनाचा लाभ मिळावा व होणार्‍या गर्दीचे नियोजन योग्य रीतीने व्हावे या उद्देशाने ३१ डिसेंबर रोजी श्रींचे समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे रात्री येणार्‍या भाविकांना पहाटे श्रींचे दर्शन महाप्रसाद घेऊन नवीन वर्षाची सुरुवात करता येणार आहे श्रींच्या भाविकांसाठी संस्थांच्या वतीने दर्शन बारी व श्रीमुख दर्शन बारी महाप्रसाद पारायण मंडप श्रींची गादी तसेच औदुंबर दर्शनाची व्यवस्था केली आहे तसेच भक्तांच्या सोयीसाठी संस्थांच्या भक्त निवासामध्ये नियमांनुसार अल्प दरात राहण्याची व्यवस्था नित्यप्रमाणे सुरू आहे.

संपूर्ण मंदिर परिसर स्वच्छता भक्तांच्या श्रींच्या प्रती आपली आस्था प्रसन्न मनाने एकरूप करणारी आहे भक्तांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी श्रींचे सेवेकरी आपली सेवा देण्यास तत्पर आहेत. दरवर्षी देशभरातील लाखो भाविक सरत्या वर्षाला निरोप देत गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन नवीन वर्षाला सुरुवात करत असतात त्यामुळे ३१ डिसेंबर रोजी लाखोच्या संख्येने भाविक शेगाव दाखल होतात त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

Protected Content