कवी रमेश धनगर उद्या जळगाव आकाशवाणीवर

भडगाव–लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील गिरड येथील कवी तथा कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था संचलित जवाहर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक, अहिराणी भाषेचे अभ्यासक, उपक्रमशील शिक्षक तथा कवी रमेश विरभान धनगर यांची जळगाव आकाशवाणीवरून मुलाखत सादर होणार आहे.

 

उद्या दिनांक २६ एप्रिल बुधवार रोजी सकाळी १० वाजता मुलाखतीचे सादरीकरण होईल. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार आहेत. स्पंदन’ या कार्यक्रमाअंतर्गत वृत्त आणि व्यक्तीत्व या कार्यक्रमात’ ही मुलाखत उद्घोषिका वैदेही नाखरे यांनी घेतली आहे. सदर दिलखुलास मुलाखतीत कवी रमेश धनगर यांनी अहिराणी लोकसाहित्य महती तसेच खान्देशातील साहित्य संस्था आणि त्यांची अहिराणी संवर्धनासाठी सुरू असलेली चळवळीवर प्रकाश टाकला आहे.

 

अहिराणी संस्कृती संवर्धनाच्या दृष्टीने त्यांचं सुरू असलेले काम, एक उपक्रमशील शिक्षक म्हणून असलेली भूमिका देखील त्यांनी विषद केली आहे. याआधीही जळगाव आकाशवाणी केंद्रावरून ‘अहिराणी म्हणी नैतीकतेच्या खाणी’ याविषयावर त्यांचं भाषण झालं आहे. त्यांच्या या यशाबद्दल जळगाव जिल्हा बँक संचालक प्रतापराव पाटील, जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाच्या संचालिका डॉ पुनम पाटील ग्रामविकास विभाग उपसचिव मंत्रालय मुंबई चे प्रशांतराव पाटील, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष शिवाजीराव पाटील प्राचार्य एस व्ही शिंदे, साहित्यिक क्षेत्रातील लोकांनी अभिनंदन केले आहे.

Protected Content