खासदार उन्मेश पाटील यांच्या प्रयत्नांतून पारोळा तालुक्यात वीज समस्या सुटली

पारोळा प्रतिनिधी । गेल्या १५ ते २० दिवसांपासून तालुक्यातील सावरखेडा, शिवरे परिसरातील शेतकऱ्यांना वीज समस्येचा सामना करावा लागत असून यासंदर्भात गावकरांनी खा. उन्मेश पाटील यांना सांगितले असता पाटील यांनी तात्काळ वीज पुरवठा सुरु करण्यास आदेश दिले होते. अखेर आज वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. 

याबाबत माहिती अशी की, पारोळा तालुक्यातील सावरखेडा, शिवरे परिसरातील शेतकऱ्यांना शेती साठी विज पुरवठा देणारे रोहित्र (डी.पी.) जळाल्याने वीज समस्या निर्माण झाली होती. याबाबत सातत्याने पाठपुरावा करून देखील विज वितरण कंपनी कडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने येथील शेतकरी भाऊसाहेब पाटील, प्रवीण पाटील, संभाजी पाटील, नाना पाटील, तुकाराम शीवरे, बापू पाटील, सागर कुमावत, दीपक पाटील यांनी खासदार उन्मेश  पाटील यांच्याशी संवाद साधून आम्हाला शेतीसाठी विज पुरवठा देणारी डी.पी बसवण्याची विनंती केली होती. खासदार उन्मेश पाटील यांनी पाचोरा उपविभाग अधिकारी शिरसाठ यांना तातडीने दखल घेत डी. पी. बसवण्याचे सूचना केली होती. आज अखेर हे रोहित्र बसविण्यात आल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Protected Content