लॉक डाउन : रोजगार बुडलेल्या रिक्षा चालकांना लोक संघर्ष मोर्चाचा मदतीचा हात

जळगाव, प्रतिनिधी । लॉकडाउनमुळे रिक्षावाल्यांचा रोजगार बंद असल्याने लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने आज जळगाव शहरातील ५० रिक्षाचालकांना लेवा भवन येथे अतिशय शिस्तबध्द पध्दतीने विशेषतः ५ महिला रिक्षा चालक व २ अपंग रिक्षाचालकांसह ५० रिक्षा चालकांना सोशल डिस्टनसिंगचे पालन करीत किराणा किटचे वाटप करण्यात आले.

लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने किराणा किटमध्ये गहू, तांदूळ तेल ,तूरडाळ ,साखर,चहा पावडर देण्यात येत आहे. यावेळी लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे , अमोल कोल्हे, डॉ. सुष्मा चौधरी, दिलीप सपकाळे व मित्रपरिवार उपस्थित होते. प्रतिभा शिंदे यांनी भास्कर फाउंडेशनच्या वतीने ८०० व लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने १२०० असे सुमारे २००० किराणा किट चे वाटप केले आहे .यात सुप्रीम कॉलनी, निमखेडी, खोटे नगर परिसर, शाहू नगर, आशाबाबा नगर, कासमवाडी, तुकाराम वाडी, पिंप्राळा, पिंप्राळा हुडको, समता नगर, कांचन नगर, गेंदालाल मिल, तांबापुरा, हरिविठ्ठल नगर, उस्मानिया पार्क यासह जळगाव शहरातील विविध भागांचा समावेश आहे . याकामी सचिन धांडे , अमोल कोल्हे , प्रमोद पाटील, नाना महाले, योगेश पाटील, राजु मोरे, दिलीप सपकाळे, फारुख कादरी , आनंदा तायडे, अकिल खान कासार, भारत सोनवणे, जुबेर खाटीक, ममता सोनवणे , ममता तडवी,अ जय तडवी, कैलास मोरे, रफिक पिंजारी, दामू भारंबे व लोकसंघर्ष मोर्चाचे कार्यकर्ते नेते यांनी सहकार्य केले . ह्या सोबतच लोक संघर्ष मोर्चा जिल्ह्यातील नागरिकांच्या रेशन वाटपासाठी असलेल्या समस्या सोडवण्या कामी ही मदत करीत असून , यापुढेही रेशन संदर्भातील काहीही समस्या असल्यास ती सोडवणार आहेत .त्यासाठी लोक संघर्ष मोर्चा आपला हेल्प लाईन नंबर देणार आहे तिथे संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Protected Content