बापरे : जळगावात आणखी तीन कोरोना बाधीत रूग्ण

जळगाव प्रतिनिधी । एकीकडे लॉकडाऊन अंतिम टप्प्यात येत असतांना आज जळगाव जिल्ह्यात तीन कोरोना बाधीत रूग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

येथील कोविड रुग्णालयात 21 एप्रिल रोजी कोरोना संशयित व्यक्तींचे स्वॅब घेतलेल्यांपैकी तीन रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले आहे. या तीनही रुग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहे.
या तीन रुग्णांमध्ये मलकापूर, जि. बुलढाणा येथील 65 वर्षीय महिलेचा समावेश आहे. तर भुसावळ येथील 43 वर्षीय महिला व अमळनेर येथील 43 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आता कोरोना बाधित रुग्णांची संख्या 14 इतकी झाली असून यापैकी एक रुगण बरा होऊन घरी गेला आहे. तर तीन रुग्णांचा मृत्यु झाला असून उर्वरित 10 रुग्ण कोरोना संसर्ग कक्षात उपचार घेत आहेत. अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ भास्कर खैंरे यांनी दिली आहे.

कालच रात्री केंद्र सरकारने दुकाने मर्यादीत प्रमाणात खुली करण्यासाठी परवानगी दिली असून आज जिल्ह्यात बर्‍याच गावांमध्ये लॉकडाऊन काही प्रमाणात शिथील झाल्याचे दिसून येत आहे. तथापि, कोरोना बाधीत रूग्णांची संख्या कमी होतांना दिसत नसल्याने ही बाब चिंताजनक मानली जात आहे.

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content