स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेस प्रारंभ

जळगाव प्रतिनिधी । आयएमआर महाविद्यालयातर्फे आयोजित स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेस कांताई सभागृहात प्रारंभ झाला. यातील पहिल्या भागात राहूल सोलापूरकर यांनी विवेकानंदांच्या आयुष्यातील विविध पैलू उगलडून दाखविले.

केसीई संस्थेच्या आयएमआर महाविद्यालयातर्फे युवा प्रेरणा दिनानिमित्त आयोजित दोनदिवसीय व्याख्यानमालेला बुधवारी कांताई सभागृहात सुरुवात झाली. या वेळी सोलापूरकर यांनी मस्वामी विवेकानंदफ हा विषय मांडला. अध्यक्षस्थानी केसीई संस्थेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.पी.पी.माहुलीकर, आयएमआर महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. शिल्पा बेंडाळे उपस्थित होत्या. अध्यक्षीय भाषणात अ‍ॅड. पाटील यांनी देशात सुधारणा व शिस्तीचे वातावरण महत्वाचे असल्याचे सांगितले. व्याख्यान समन्वयिका डॉ. शमा सराफ यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

याप्रसंगी राहूल सोलापूरकर म्हणाले की, कशालाही न घाबरता दररोज नवीन गोष्टी शोधणे, नवीन संशोधनाचे काम करणे हे स्वामी विवेकानंद यांनी आयुष्यभर केले. प्रत्येक गोष्ट कुतूहलाने पाहण्याची व समजून घेण्याची वृत्ती त्यांनी लहानपणापासून जोपासली. त्यांनी कृतीत आणलेला हा संदेश समोर ठेवून आपल्याला पडलेले प्रत्येक कुतूहल शमलेच पाहिजे. विवेकानंद यांना शिक्षणाची आवड नव्हती. त्यामुळे त्यांचा विद्येशी जास्त संबंध नव्हता. मात्र, त्यांची बुद्धिमत्ता प्रखर होती. त्यांना कोणतीही गोष्ट ही क्षणात लक्षात राहत असल्याने ते ऐतिहासिक व धार्मिक गोष्टींकडे अधिक लक्ष देत असल्याचे सोलापूरकर यांनी सांगितले.

Add Comment

Protected Content