Home Cities जळगाव विक्रीस बंदी असलेले कापूस बियाणे जप्त

विक्रीस बंदी असलेले कापूस बियाणे जप्त


जळगाव प्रतिनिधी । शासनाकडून मान्यता नसतांना अनधिकृतपणे गुजरात येथील एचटीबीटी कापूस बियाणे विक्री करणाऱ्या कारवाई करत ५ हजार रूपये किंमतीचे ५ पाकीटे जप्त करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी दिली आहे.

अमळनेर शहरातील कारंजा चौकातील श्रीकृष्ण ॲग्रो व इरिगेशन या दुकानावर जिल्हा गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक श्रीराम तायडे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली आहे. याबाबत दुकान मालक जितेंद्र दिनकर पाटील रा. अमळनेर यांच्याविरूध्दी अमळनेर पोलीस ठाण्यात बियाणे नियम १९६८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याकामी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकुर, कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद, वैभव शिदे, तालुका कृषि अधिकारी, अमळनेर भरत वारे, मोहिम अधिकारी पी. एस. महाजन, जिल्हा परिषद, जळगाव, अमोल भदाणे, कृषि अधिकारी व विस्तार अधिकारी पंचायत समिती, अमळनेर गणेश पाटील, व कृषि सहाय्यक अमळनेर यांनी परिश्रम घेतले.


Protected Content

Play sound