चोरीच्या २४ दुचाकींसह अट्टल गुन्हेगाराच्या आवळल्या मुसक्या; १५ गुन्हे उघडकीला !

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातून लांबविलेल्या २४ दुचाकींसह संशयित आरोपीला आज स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सातपुडा पर्वतातील बोरमळी जंगलातून अटक केली आहे. त्याच्या ताब्यातील १५ गुन्ह्यातील २४ दुचाक्या हस्तगत केल्या आहेत.

गणेश उफ गुंठ्या भल्या पावरा (वय-२०) रा. बोरमळी ता. चोपडा असे संशयित आरोपीचे नावे आहे. चोपडा तालुक्यातील बोरमळी भागात संशयित आरोपी हा जळगाव शहरासह जिल्ह्यातील विविध भागात जावून दुचाकींची चोरी करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार अशोक महाजन, श्रीकृष्ण पटवर्धन, अश्रम शेख, सुनिल दामोदरे, प्रदीप पाटील, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, दिपक शिंदे, मुरलीधर बारी, वसंत लिंगायत आणि उमेशगीरी गोसावी यांनी सापळा रचला. आज दुपारी संशयित आरोपीला बोरमळी गावाच्या बाहेर जंगलात असतांना अटक केली. त्याची अधिक चौकशी केली असता त्याने चोरीच्या २४ दुचाकी काढून दिल्या. पुढील कारवाईसाठी संशयित आरोपीला जळगाव शहर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

Protected Content