विद्यापीठात विविध कार्यक्रमांनी शिवजयंती साजरी

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कवियत्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात प्रतिमापूजन, पथनाटय, पोवाडा, लेझीम, गीत गायन करीत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

शिवजयंतीच्या निमित्ताने कार्यक्रमाच्या सुरवातीला विद्यापीठाचे प्रभारी  प्र-कुलगुरू प्रा. बी व्ही पवार यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबडेकर,  सरस्वती प्रतिमा, सरदार वल्लभ भाई पटेल आदींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी प्रभारी कुलसचिव प्रा. रा. ल. शिंदे, परीक्षा मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक प्रा. दीपक दलाल, विचारधारा प्रशाळेचे संचालक प्रा.अनिल डोंगरे, छत्रपती शिवाजी महाराज अध्यासनाचे प्रभारी प्रमुख प्रा.अजय पाटील, प्रा. आर.जे. रामटेके, प्रभारी वित्त व लेखा अधिकारी एस.आर.गोहिल, आदी उपस्थित होते.

त्यानंतर  लोककलावन्त विनोद ढगे यांच्या पथकाने आरोग्य विषयक पथनाट्य सादर केले.  सामाजिक शास्र विभागाच्या नीता पाटील यांनी शिवाजी महाराज यांच्या वर  ‘दैवत आमचे छत्रपती’ हे गीत साजरे केले. त्यानंतर विद्यापीठाच्या एमबीएच्या विद्यार्थिनींनी लेझीम नृत्य केले.  यावेळी समाजकार्य अभ्यासक्रमाचे काही विद्यार्थी आदिवासी पारंपरिक वेशभूषेत होते. बाल शिवाजीच्या वेषभूशेत रियान उमेश गोगडीया याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले

समाजकार्य  अभ्यासक्रमाचे विद्यार्थी अक्षय महाजन व जयेश साळुंखे याने पोवाडा सादर केला. सूत्रसंचालन डॉ.दीपक सोनवणे यांनी केले. यावेळी विद्यापीठातील  शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. कोरोना संदर्भात मार्गदर्शक  नियमांचे पालन करुन सदर कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी छत्रपती शिवाजी महाराज अध्यासनाचे कर्मचारी यांनी सहकार्य केले.

Protected Content