जळगाव जिल्हा नाकाबंद दरम्यान पोलीस दलाची धडक कारवाई

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने २० मार्च रात्री ११ ते २१ मार्च सकाळी ५ वाजेच्या दरम्यान जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस स्टेशनच्या हद्दीतील नाकाबंदी राबविण्यात आले होते. या कारवाईत‍ि गुन्हेगार, ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह यासह अवैध धंदे व गुन्हेगारांवर कारवाई केली आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी मंगळवार २१ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

यासंदर्भात माहिती अशी की, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी जळगाव जिल्हा नाकाबंदी मोहीम राबवण्याचे आदेश दिले. त्यानुसार अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, रमेश चोपडे यांच्यासह ४८ पोलिस अधिकारी व १८३ पोलीस कर्मचारी यांनी २० मार्च रोजी रात्री ११ ते २१ मार्च रोजी सकाळी ५ वाजेच्या दरम्यान जिल्ह्यातील हॉटेल्स, लॉज, ढाबे चेक करण्यात आले. तसेच ८०० वाहने, १५५ रेकॉर्डवरील गुन्हेगार यांची तपासणी केली. वाहन कायद्यानुसार ५८ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ८ गुन्हेगारांना वॉरंट बजावण्यात आले, तसेच २ हद्दपार आरोपी, २ सराईत गुन्हेगार यांना अटक केली आहे. शिवाय दारूबंदी, ड्रंक अँड ड्राईव्ह करणाऱ्यांवर कारवाई यासह इतर कारवाई नाकाबंदीत करण्यात आली होती. अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी मंगळवार २१ मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

Protected Content