निकालपत्राचे वाचन सुरू: सर्व आरोपी दोषी जाहीर; धाकधूक वाढली

WhatsApp Image 2019 08 31 at 11.39.41 1

धुळे विशेष प्रतिनिधी । संपूर्ण राज्यात गाजलेल्या घरकुल घोटाळ्याचा निकाल आता कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. निकालपत्राचे वाचन सुरू झाले असून न्यायमूर्ती सृष्टी नीलकंठ यांनी सर्व आरोपींना ताब्यात घेण्याचे आदेश दिल्यामुळे एक प्रकारे सर्व जण दोषी ठरल्याचे स्पष्ट होत आहे.  न्यायालयाच्या आवारात सर्व संशयित आरोपींच्या नातेवाईकांनी आणि समर्थकांनी प्रचंड गर्दी केली आहे या वेळी सर्वांच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्टपणे दिसून येत आहे विशेष म्हणजे कोर्टाच्या आवारात सर्व समर्थकांची आणि नातेवाईकांची होत असलेली घालमेल बघून एकंदरीत निकालाची प्रचंड धाकधूक वाढली असल्याचे दिसून येत आहे.

यावेळी निकाल ऐकण्‍यासाठी जळगाव येथील सर्वपक्षीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आमदार चंद्रकांत सोनवणे माजी महापौर विष्णू भंगाळे, विशाल देवकर नगरसेवक मनोज चौधरी, धरणगाव राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष रवींद्र पाटील लिलाधर तायडे पुरुषोत्तम चौधरी धरणगाव राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष धनराज माळी यांच्यासह मोठ्या संख्येने राजकीय पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित आहेत

निकाल काय लागेल यावर चर्चा
यावेळी कोर्टावर उपस्थित असलेल्या सर्व राजकीय पदाधिकाऱ्यांमध्ये नेमका निकाल काय लागेल कोणता दोषी ठरू शकते कोण सुटेल यावर चर्चा रंगल्या आहेत काही जणांना निर्णय सुटण्याचा विश्वास आहे तर तर काहीजण निकालाच्या बाबतीत प्रचंड तणावात दिसून येत आहे अगदी दोन दोन मिनिटात पत्रकारांकडून राजकीय पदाधिकारी निकालाची परिस्थिती काय आहे??याबाबत विचारपूस करीत आहे.

Protected Content