केमिकल फॅक्टरी स्फोटातील मृतांची नऊ; २० जण गंभीर

WhatsApp Image 2019 08 31 at 12.52.43

धुळे प्रतिनिधी । शिरपूर जवळील वाघाडी येथील केमिकल फॅक्टरीला सकाळी १० वाजेच्या सुमारास अचानकपणे आग लागून बॉयलरचा स्फोट झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या स्फोटात आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार ९ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर २० जण गंभीर भाजले गेले आहे. त्यांना उपचारार्थ धुळे जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले असून उर्वरित सुमारे ५० जखमी कामागारांवर शिरपूर येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान जिल्हाधिकारी डी. गंगाथरन यांनी घटनास्थळी भेट दिली असून उपजिल्हा रूग्णालयात जावून जखमींची विचारपुस केली आहे. दुर्घटना घटली त्यावेळी फॅक्टरीत सुमारे ८० कामगार शिप्टमध्ये काम करत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यापैकी ७२ कामगारांना तर ८ सुपरवाईझर आहेत. स्फोटाची भिषणता बघता स्थानिक प्रशासनाने वाघाडी गाव रिकामे करण्याचे आदेश दिले आहेत.

मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
दरम्यान घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या तसेच प्रशासन अधिकारी प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी आपल्या फौजफाटा सहित धाव घेतली असून परिस्थितीची पाहणी करत आहेत. बॉयलरचा स्फोट इतका भीषण होता कि, शिरपूर शहरासह परिसरातील ८ ते १० किलोमीटर अंतरावरील गावांना आवाज ऐकू आल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान बॉयलर सतत पेट घेत असल्यामुळे आग विझविण्याच्या मदत कार्यात मोठी अडचण निर्णाण होत आहे. फॅक्टरीत सहा बॉयलर असून आतापर्यंत ४ बॉयलरचे स्फोट झाले आहेत. आणखी स्फोट होण्याची शक्यता आहे. धुरांचे लोळ तब्बल 20 फुटांपर्यंत उंच असल्यामुळे मदत कार्य करण्यास अडचण निर्माण होत आहे.

Protected Content