मु.जे.महाविद्यालयात ‘संघर्ष, निराकरण आणि शांतता’ या विषयावर चर्चासत्र

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मू.जे. महाविद्यालयात प्रा. डॉ. सी. पी. लाभणे यांच्या गौरवार्थ मानसशास्त्र विभाग, सामाजिकशास्त्र प्रशाला आणि प्राध्यापक सी. पी. लाभणे गौरव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘संघर्ष, निराकरण आणि शांतता’ या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न झाले.

 

या चर्चासत्रात पहिल्या सत्राचे अध्यक्षपद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. स. ना. भारंबे सर यांनी भूषवले. उद्घाटक म्हणून डॉ. पी. आर. चौधरी सरप्राचार्य, धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर हे उपस्थित होते, बीजभाषक म्हणून प्रा. डॉ. बाळ राक्षसे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, मुबई यांनी ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरस ने उपस्थित सहभागी प्राध्यापक, संशोधक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आपल्या मार्गदर्शनात डॉ बाळ राक्षसे यांनी संघर्ष, त्याचे प्रकार कारणे या घटकावर प्रकाश टाकत स्थानिक पातळी वरील संघर्षपासून जागतिक पातळीच्या संघर्ष पर्यंतचे स्वरूप व तीव्रता कशा प्रकारची असते हे मार्गदर्शन केले तसेच या संघर्षातून निराकरण आपण कशाप्रकारे करू शकतो आणि शांतता कशाप्रकारे प्रस्थापित करू शकतो या सर्व मुद्द्यांवर डॉ. बाळ राक्षसे सरांनी सविस्तर मार्गदर्शन केले. या सत्राचे प्रास्ताविक प्रा. देवेंद्र इगले सर, सूत्रसंचालन डॉ राणी त्रिपाठी आणि आभार प्रदर्शन डॉ. बालाजी राऊत यांनी केले.

 

 

कार्यक्रमाच्या दुसरेसत्र पॅनल डिस्कशन मध्ये प्रा. डॉ राजेंद्र मस्के सर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांनी महावीर जैन यांच्या जयंती निमित्त शांतता या विषयावरचे राष्ट्रीय चर्चा सत्र घेणे म्हणजे खरे सार्थक असे प्रतिपादन करत संघर्ष, निराकरण, शांतता, आणि राजकीय स्थिरता या विषायावर चर्चा करतांना जगभरात विविध देशातील झालेले राजकीय संघर्ष, पाहिले व दुसरे महायुद्ध त्याची कारणे त्यातून निर्माण झालेले रक्तरंजित क्रांती, संघर्ष यावर प्रकाश टाकत क्रांती आणि संघर्ष यातील फरक व साम्य, भारतातील झालेले राजकीय संघर्ष,  निराकार आणि शांतता यावर सविस्तर मार्गदर्शन केले. डॉ. अपर्णा अष्ठपूत्रे यांनी सामाजिक समस्या, सामाजिक संघर्ष, त्यातून होणारा सामाजिक विकास या विषयावर मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून प्रकाश टाकला. प्रा. डॉ. नागोराव डोगंरे यांनी संघर्षातून निराकरनासाठी गौतमबुद्धांची पंचशील तत्वे व विपश्यना याची आजच्या काळातील उपयोगिता या विषयावर भर दिला.

 

या सत्राचे अध्यक्ष प्रा. डॉ. पी. व्ही. रसाळ सर यांनी पूर्ण सत्राचा आढावा घेऊन सामाजिक, राजकीय विकासात फुले, शाहू आणि आंबेडकर यांच्या विचारांची भूमिकाव महत्व स्पष्ट केले. आजच्या तरुण पिढी समोर असलेली संघर्ष, आव्हाने ते कशा प्रकारे सोडवू शकतात त्यांच्या निरकरणातून नवनिर्मिती कशी होवू शकते त्यासाठी तरुणांनी स्व चा विनाशर्थ स्वीकार करून स्वतःची धेय्य ठरवून कशा प्रकारे यशस्वी होऊ शकतात या विषयी मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून मार्गदर्शन केले. चर्चासत्राचा तिसऱ्या सत्रात डॉ. राकेश रामटेके यांनी संगणकीय दृष्टिकोनातून आजच्या संघर्षांची निराकार कशा प्रकारे करू शकतो यात कृत्रिम बुद्धिमत्ता, गुगल, युट्यूब यासर्व मुद्द्यांवर चर्चा केली. चौथ्या सत्रात चर्चा सत्रास आलेल्या संशोधक विद्यार्थ्यांनी शोधनिबंध सादर केले या सत्राचे अध्यक्ष प्रा. डॉ. शंकर जाधव यांनी संशोधकांनी कशा प्रकारे आजच्या संघर्षांची, समस्यांची उकल संशोधनातुन केली पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले.

 

समारोप सत्रात डॉ. शांताराम रायपुरे यांनी अध्यक्ष पद स्वीकारले त्यांनी अनुभवावरून त्याच्या व्यक्तिमत्व व वैयक्तिक जीवनावर प्रकाश टाकला,  या सत्रात प्रमुख वक्ते म्हणून डॉ. मनोहर जाधव, (डॉ. बाबासाहेब अध्ययन केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे) यांनी डॉ. सी. पी. लभाने यांच्या गौरवार्थ त्यांच्या जीवन कार्यासोबत शैक्षणिक, सामाजिक, राजकीय कार्यावर प्रकाश टाकला. या सत्रात डॉ. चारुदत्त गोखले सर, डॉ. डोंगरे सर, डॉ. जोशी सर, डॉ. शशिकांत हिंगोणेकर यांनी विशेष उपस्थिती दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी डॉ. सी. पी. लभाने यांचे विशेष सत्कार केला. यासत्राचे सूत्रसंचालन डॉ. अनिल क्षीरसागर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. हिगोणेकर, डॉ. ललिता निकम, डॉ. बालाजी राऊत, डॉ. राणी त्रिपाठी, विकास वाघ, समाधान पाटील, हिरामण पाटील, अजय पाटील, सुश्मिता भालेराव, शुभम मनुरे, दीपक लाबोळे आणि समीर पवार यांनी मेहनत घेतली.

Protected Content