चिमुकल्या ‘विष्णू’च्या मदतीला धावून आले गुरुजन !

 

 

पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । झाडाची फांदी डोक्यावर पडून गंभीर रित्या जखमी होऊन कोमात गेलेल्या तालुक्यातील हिवरखेडा येथील चिमुकल्या ‘विष्णू’ वर जळगाव येथे अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्याच्या वैद्यकीय मदतीसाठी जामनेर येथील जीनियस मास्टर्स फाउंडेशन धावून आले आहे. ५० हजारांची मदत  करून गुरुजनांनी खऱ्या अर्थाने माणूसकीचे दर्शन घडविले आहे.

 

पहूर येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात शिकणारा विष्णू गणेश कुमावत या विद्यार्थ्याच्या डोक्यावर पिंपळाच्या झाडाची फांदी पडल्याने शनिवारपासून त्याच्यावर जळगाव येथे डॉ. डाबी  यांच्या दवाखान्यात उपचार सुरू असून तो मृत्यूशी झुंज देत आहे. घरची परिस्थिती हालाखीची असल्याने शाळेतील विद्यार्थ्यांसह शिक्षकांनीही मदतीचा हात पुढे केला आहे.

 

त्याचबरोबर आज गुरुवारी जामनेर येथील जीनियस मास्टर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रमेश पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी  नगरपालिका गटनेते डॉ. प्रशांत भोंडे, नगरसेवक सुहास पाटील, पंचायत समिती गटनेते अमर पाटील यांच्या सहकार्याने फाउंडेशनच्या व्हाट्सअप ग्रुप वर मदतीचे आवाहन करताच गुरुजनांचे  मदतीचे हात पुढे सरसावले. दोनच दिवसात ५० हजार रुपयांचा मदत निधी संकलित करून आज हिवरखेडा येथील ग्रामस्थ बाळकृष्ण पाटील, बाळू पाटील, महेश पाटील, भास्कर पाटील यांच्या स्वाधीन केला .

सचिव नामदेव पाटोळे , उपाध्यक्ष जनार्धन लोखंडे , किशोर काळे ,  श्रीकांत पाटील , संदीप पाटील ,  राहुल महाजन , किशोर पाटील ,  विलास भुसारी ,स्वप्निल कासार यांच्यासह शिक्षकांनी मदतीसाठी आवाहन केले .

 

विद्यार्थ्यांनी केली प्रार्थना

सावित्रीबाई फुले विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आज शालेय परिपाठात विष्णूच्या उदंड दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. दवा आणि दुवा दोघेही कामी येतील असा आशावाद मुख्याध्यापिका व्ही. व्ही.घोंगडे यांनी व्यक्त केला.

 

समाजाचा आपण एक देणं लागतो या कृतार्थ भावनेतून जीनियस मास्टर फाउंडेशन कार्यरत आहे . चिमुकल्या विष्णूच्या वैद्यकिय उपचारासाठी गुरुजनांनी मदत केली . अशा संकट काळी सर्वांनी पुढे येणे हाच खरा माणुसकी धर्म आहे. असे आवाहन फाऊंडेशनचे अध्यक्ष रमेश पाटील यांनी केले आहे.

Protected Content