जळगाव व चाळीसगावात डाक मेळाव्याचे आयोजन

जळगाव प्रतिनिधी । जळगाव व चाळीसगाव येथील मुख्य डाकघरांमध्ये ४ ते १४ जानेवारींच्या दरम्यान डाक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

जळगाव शहरातील मुख्य डाकघर व चाळीसगाव येथील मुख्य डाकघर येथे विविध सेवांबाबत ४ ते १४ जानेवारी दरम्यान डाक मेळा आयोजित करण्यात आला आहे. पोस्टमास्टर जनरल औरंगाबाद परिक्षेत्र यांच्या आदेशानुसार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात पोस्ट ऑफिस सेव्हिंग बँक अकाउंट उघडणे, विशेष सुकन्या अकाउंट ओपनिंग ड्राइव्ह, आधार एनरॉलमेंट व अपडेशन ड्राइव्ह, टपाल / डाक जीवन विमा, आई.पी.पी.बी अकाउंट उघडणे, प्रधानमंत्री योजना आदी सेवा उपलब्ध आहे, असे डाकघर अधीक्षक डॉ. भगवान नागरगोजे यांनी केले आहे. नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

Protected Content