जळगावातील फुले मार्केटमधून दुचाकी लंपास

जळगाव प्रतिनिधी । शहरातील फुले मार्केटमध्ये खरेदी करण्यासाठी आलेल्या तरूणाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी शहर पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, वसीम मुनाफ खाटील (वय-३०) रा. निमखेडा, ता.जि.जळगाव हा २९ फेब्रुवारी २०२० रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास फुले मार्केटमध्ये दुचाकी क्रमांक (एमएच १९ डीएक्स ४१९२) ने आले. दुचाकी चंदूलाला रसवंती दुकानाजवळ लावली होती. खरेदी करून ४ वाजता परत आल्यानंतर त्यांना दुचाकी मिळून आली नाही. त्यांनी शोधाशोध करूनही मिळून न आल्याने आज शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content