अमळनेरात ‘गोमातेला ५६ भोग’ उपक्रमास उत्स्फुर्त प्रतिसाद

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील  श्रीमती भानूबेन बाबूलाल शहा गोशाळा,पळासदडे रोड,अमळनेर येथे गोमातेस ५६ भोग कार्यक्रमास असंख्य गोप्रेमी आणि भविकांचा प्रचंड मोठा प्रतिसाद लाभला.

 

भारतीय धार्मिक परंपरेत देवी देवतांना ५६ भोग चढविण्याची प्रथा आहे,परंतु ज्या गोमतेच्या पोटात ३६ कोटी देवतांचा निवास आहे,त्याच गोमतेला ५६ भोग चढविण्याची प्रथा राजस्थान मध्ये गोप्रेमींनी सुरू केली आहे. तेथील उपक्रमाने प्रेरित झालेल्या अमळनेर येथील गोप्रेमी सौ अर्चना गिरीश वर्मा यांनी आपल्या महाराष्ट्रात देखील हा उपक्रम झाला पाहिजे अशी इच्छा इतर गोप्रेमींकडे व्यक्त केली होती. त्यास सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने पहिल्यांदा अमळनेरातच हा उपक्रम घेण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी अमळनेर येथील श्रीमती भानुबेन बाबूलाल शाह गोशाळेचे चेतन शाह यांनी प्रोत्साहन दिल्याने याच गोशाळेत अक्षयतृतीयेचा मुहूर्त निश्चित करण्यात आला. मदतीसाठी जाहीर आवाहन करताच अमळनेर शहर व तालुक्यातील गो सेवकांनी भरभरून दान दिले. कोणी धान्य,कुणी मिठाई कुणी चारा तर कुणी रोख रक्कम दिली.

 

३३५ गोमतांना चढविला ५६ भोग

 

श्रीमती भानुबेन शहा गोशाळेत आयोजित कार्यक्रमात  गोमतेला ५६ भोग म्हणजे ५६ प्रकारच्या वेगवेगळ्या पदार्थांचा यात समावेश होता. यात प्रामुख्याने  मिठाई,लाडू,जिलेबी,पुरणपोळी,  ड्रायफुट,फळे,भाजीपाला,गूळ, चारा,ढेप यासह ५६ प्रकारच्या खाद्यचा समावेश होता. त्याठिकाणी ५६ पदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते,सर्वप्रथम अर्चना वर्मा व गिरीश वर्मा यांच्या हस्ते गोमतेची आरती होऊन भोग कार्यक्रमास सुरूवात झाली. यावेळी जोडीने आलेल्या प्रत्येक भाविकांना गोमतेस भोग चढविण्याचा मान देण्यात आला. उत्कृष्ट नियोजनामुळे कोणताही गोंधळ न होता शांततेत व शिस्तीने हा कार्यक्रम पार पडला. यावेळी महिला भगिनींकडून गोमतेची सुंदर भजने सादर झाल्याने कार्यक्रमात वेगळीच रंगत आली होती. निश्चितच मनाला शांती आणि आनंद देणारा हा कार्यक्रम असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त करून सौ अर्चना वर्मा व गिरीश वर्मा आणि इतर सहकार्‍यांचे कौतुक केले. आणि चेतन शाह व सौ मीना शाह हे दाम्पत्य अनेक वर्षापासून करीत असलेल्या गोसेवेचेही सर्वांनी कौतुक केले.दरवर्षी हा उपक्रम घेण्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.

 

बोहरी बांधवानीही चढविला भोग,,

 

या कार्यक्रमाचे वैशिट्य म्हणजे याच दिवशी रमजान ईद चे पर्व असताना अमळनेर शहरातील बोहरी समाज बांधव देखील जोडीने गोमतेला भोग चढविण्यासाठी उपस्थित होते. त्यांनी आनंदाने गोमतेस भोग अर्पण केला. यात मकसूद बोहरी,मेहराज बोहरी,शब्बीर बोहरी,सखींना बोहरी,अहमदी बोहरी,समीना बोहरी,फरीदा बोहरी आदींचा समावेश होता, त्यांच्या उपस्थिती  मुळे हिंदू मुस्लिम एकात्मतेचा संदेश यातून दिला गेला.

 

कार्यक्रमातही देणगीची बरसात,,

 

कार्यक्रमाचे स्वरूप पाहून उपस्थित दानदात्यानी गोशाळेसाठी भरभरून देणग्या दिल्या. यात पर्यंककुमार विनुभाई पटेल यांनी आपल्या मातोश्री स्वर्गीय मृदुलांबेन पटेल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कबुतर खान्यातील कबुतरांच्या खाद्यासाठी संपूर्ण वर्षभराचा खर्च तसेच महावीर पतपेढी चे चेअरमन प्रकाशचंद पारेख यांनी गोशाळेस शुद्ध व थंड पाण्यासाठी वॉटर कुलर आणि वर्मा दाम्पत्याने दोन सिलिंग फॅन भेट दिले. तर इतरांनी रोख देणग्या दिल्यात.

 

छत्रपती शिवाजी महाराज गार्डन ग्रुपचे अनमोल सहकार्य

 

या उपक्रमासाठी छत्रपती शिवाजी महाराज गार्डन गृप सदस्यांनी सर्वाधिक मदत व सहकार्य करून अथक परिश्रम घेतले,याशिवाय श्रीमती भानुबेन बाबूलाल शहा गोशेळेचे सेवक तसेच गुजराथी महिला मंडळ,कनगोर महिला मंडळ,योगा ग्रुप महिला मंडळ,माहेश्वरी महिला मंडळ,न्यू प्लॉट महिला मंच यासह शहरातील विविध मंडळ आणि महिला व पुरुष भाविकांचे अनमोल सहकार्य लाभले.

Protected Content