मुलांप्रमाणे झाडांचेही वाढदिवस साजरे करा : मुख्याधिकारी अविनाश गांगोडे

2766bb84 e57b 42e7 b95f 43864e49f620

 

चोपडा (प्रतिनिधी) पर्यावरणाची स्थिती लक्षात घेता केवळ पावसाळ्यात वृक्षारोपण करणे पुरेसे नसून लावलेल्या रोपांची झाडांची काळजी घेणे, त्यांचे संगोपन करणे अत्यंत आवश्यक आहे. झाडांच्या उत्तम संगोपनासाठी प्रत्येकाने लावलेल्या झाडाची उत्तम काळजी घ्यावी, निगा राखावी. आपल्या मुलांच्या वाढदिवसाप्रमाणे आपण लावलेल्या झाडाचा देखील वाढदिवस साजरा करावा, असे आवाहन चोपडा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांनी केले.

येथील इनरव्हील क्लब ऑफ चोपडाच्यावतीने जुन्या शिरपूर रोडवरील श्री हरेश्वर मंदिर परिसरात आयोजित वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी पो. नि. विनायक लोकरे, न. पा. पाणीपुरवठा अभियंता पल्लवी घिवंदे, रोटरी क्लबचे अध्यक्ष नितीन जैन, सचिव आशिष अग्रवाल, रोटरीचे ज्येष्ठ सदस्य रोटे. एम. डब्ल्यू. पाटील, पत्रकार संजय बारी, इनरव्हीलच्या अध्यक्षा डॉ. कांचन टिल्लू, सचिव चेतना बडगुजर, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी अश्विनी गुजराथी हे मंचावर उपस्थित होते.

भारतीय संस्कृती प्रमाणे झाडे ही देवाची रूप आहेत. जो देतो तो देव हा संस्कार आपल्यावर आहे. झाडे संपूर्ण आयुष्यभर माणसाला देतच असतात म्हणून प्रत्येक सदस्यांनी एक झाड दत्तक घ्यावे त्याची काळजी घ्यावी, असे पो. नि. विनायक लोकरे यांनी उपस्थित इनरव्हील सदस्यांशी संवाद साधताना सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा पाटील यांनी केले. तर यशस्वीतेसाठी चंचल जयस्वाल, नितु अग्रवाल, शीला शेलार, लता छाजेड, रुपाली काबरा, शैला सोमानी, राजेश्वरी अग्रवाल, पारूल जैन, सेजल अग्रवाल, सरला राजपूत, ज्योती चौधरी, ज्योती वारके, नीता अग्रवाल, वैशाली अग्रवाल , दर्शना जैन, पूजा तोतला यांनी परिश्रम घेतले. यावेळी ज्येष्ठ सदस्य विजयालक्ष्मी रिखी यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवर व इनरव्हील सदस्यांनी श्री हरेश्वर मंदिर परिसरात वृक्षारोपण केले.

Protected Content