जिल्ह्यात आज २८१ कोरोना पॉझिटीव्ह तर २४८ रूग्ण झालेत बरे !

जळगाव प्रतिनिधी । आज जिल्ह्यातील २८१ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे सायंकाळी आलेल्या रिपोर्टवरून दिसून आले असून आजच २४८ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

आज केंद्रीय समिती जिल्हा दौर्‍यावर आली असतांना जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग कायमच असल्याचे दिसून आले आहे. आज सायंकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये जिल्ह्यात २८१ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे दिसून आले आहे. तथापि, एक सकारात्मक पैलू म्हणजे आजच २४८ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

जिल्हा माहिती कार्यालयाने आज सायंकाळी जारी केलेल्या प्रेस नोटनुसार जिल्ह्यात २८१ कोरोना बाधीत आढळून आले आहेत. यात सर्वाधीक ८८ रूग्ण हे जळगावातील आहेत. याच्या खालोखाल एरंडोलमध्ये २७; जळगाव ग्रामीण व चोपड्यात-२२ तर भुसावळात २१ रूग्ण आढळून आले आहेत.

उर्वरित जिल्ह्याचा विचार केला असता, अमळनेर-९; पाचोरा-१४; भडगाव-९; धरणगाव-२; यावल-७; जामनेर-१६; रावेर-१२; पारोळा-२; चाळीसगाव-११; मुक्ताईनगर-१७ तर दुसर्‍या जिल्ह्यातील दोन असे रूग्ण आढळून आले आहेत.

Protected Content