सध्याचे युग हे स्त्री-पुरुष समतेचे: मंगला पाटील

भुसावळ प्रतिनिधी । सध्याचे युग हे स्त्री-पुरुष समतेचे आहे. अशा काळात स्त्रीवर्गाला अपमानास्पद होणारा भेदभाव करणे हे काळाशी सुसंगत नसल्याचे प्रतिपादन उद्योजिका मंगलाताई पाटील यांनी केले. त्या महिला सन्मान सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या.

या वेळी मंचावर कार्यक्रम अध्यक्ष मंगला पाटील, मार्गदर्शक आरती पाटील, भुसावळ न.प. मुख्याधिकारी करुणा डहाळे, अ‍ॅड. स्वाती पाटील, भारती मस्के, समिती अध्यक्षा प्रा.सीमा पाटील, सचिव कविता ठोके, उपाध्यक्षा ज्योत्स्ना खैरनार, प्रभा पाटील, मोना भंगाळे, शुभांगी राठी, आशा तडवी, शारदा धांडे, प्रज्ञा ढाके, मिनाक्षी धांडे, उषा रमेश भोई, टीना धांडे उपस्थित होत्या. उदघाटन भुसावळ न.प. मुख्याधिकारी करुणा डहाळे यांच्याहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात आजी-माजी सैनिक माता, पत्नी, शेतकरी, कामगार, डॉक्टर, इंजिनीअर, वकील, महिला शिक्षक, जेष्ठ महिलांचा व होतकरू व कर्तृत्ववान महिलांसोबत सामाजिक, शैक्षणिक, उद्योग, सांस्कृतिक यासह विविध क्षेत्रात कार्यरत १०० महिलांचा गौरव करण्यात आला.

याप्रसंगी करुणा डहाळे म्हणाले की, आता स्त्री सक्षम झाली आहे, तिचे सामर्थ्य जगासमोर आले आहे. स्त्री – पुरुष समानतेचा आणि परस्पर सहकार्याचा अत्यंत आवश्यक असा नवा विचार रुजू करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. असे मत करूणा डहाळे यांनी मांडले. दरम्यान, आरती चौधरी यांनी मुलींना घरातून आईच चांगले संस्कार देऊ शकते कारण आई एक चांगली समुपदेशक असते, अ‍ॅड. स्वाती पाटील यांनी लैंगिक अत्याचार विरोधात असलेल्या कायद्याचे मार्गदर्शन केले, आशा तडवी यांनी वैवाहिक जीवनात होणार्‍या छोट्या मोठ्या भांडणाने घरसंसार कसा मोडतो त्याची माहिती दिली, भारती मस्के यांनी किशोरवयीन मुलींना समुपदेशन केले. तसेच कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमासाठी प्रा.सीमा पाटील, ज्योत्स्ना खैरनार, कविता ठोके, प्रीती राणे, पूजा खैरनार, योगिता दुसाने, रुपाली पाथरवट, ललिता पाटील, कोमल पाटील, पल्लवी कोळी, ललिता कोळी, नयना बोंडे, प्रतिभा चौधरी, अर्चना झटकार, भारती झांबरे, सुषमा खैरनार, सुवर्णा पाटील यांनी परिश्रम घेतले.

Protected Content