कोरोनामुळे पंतप्रधानांचा बांगलादेश दौरा रद्द

नवी दिल्ली । कोरोना व्हायरसच्या प्रादूर्भावामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बांगलादेश दौरा रद्द करण्यात आला आहे. ते शेख मुजीबूर रहेमान यांच्या शताब्दी सोहळ्यात भाग घेणार होते.

पंतप्रधान मोदी १७ मार्चला बांगलादेशला जाणार होते. मात्र कोरोनामुळे त्यांना हा दौरा रद्द करावा लागला आहे. शेख मुजीब उर रहमान यांच्या जयंती निमित्त आयोजित केलेला शताब्दी सोहळा रद्द करण्यात आल्याची माहिती सोहळ्याच्या आयोजन समितीचे अध्यक्ष कमाल अब्दुल चौधरी यांनी दिली. दरम्यान, शेख मुजीब उर रहमान यांच्या जयंती निमित्त आयोजित शताब्दी सोहळ्याची नव्यानं आखणी करण्यात येईल, अशी माहिती चौधरींनी दिली. महा सोहळा वर्षभर चालेल. मात्र सध्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गर्दी टाळायची आहे. आम्ही वर्षभर कार्यक्रम करू आणि जगभरातल्या दिग्गज व्यक्ती यात सहभागी होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी मोदींना या सोहळ्याचं निमंत्रण दिलं होतं.

Protected Content