नवनिर्वाचित नगराध्यक्ष निलेश चौधरी यांचा धडाका; शहर विकासासाठी ९० कोटींचे प्रस्ताव रवाना

nilesh chaudhari 1 1

धरणगाव प्रतिनिधी । येथिल लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी आपला नगराध्यक्ष पदाचा कारभार सांभाळल्यावर शहर विकासासाठी तब्बल ९० कोटी रूपयांचे प्रस्ताव मंत्रालयात सादर केले असून याला लवकरच मंजुरी मिळण्याचे संकेत आहेत.

नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी नगरपालिकेच्या सर्वसाधारण मिटींगमध्ये धरणगाव शहरातील रखाडलेले कामांची अधिकारी कर्मचारी याचं कडून माहिती घेतली. धरणगाव शहराच्या पाणीपुरवठा योजनेचा शहरातील अंतर्गत पाईपलाईन व भुयारी गटारी साठी सुमारे ९० कोटींचा प्रस्ताव मंजुरी साठी मंत्रालयात पाठवण्यात आला आहे. ही योजनेचा पीएमसी अंतर्गत येत असल्याने त्याची जाहिरात देण्याचे निर्देश मुख्यधिकारी पवार यांना देण्यात आले. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रस्तावाला मजुरी मिळण्याची शक्यता आहे.

तसेच या बैठकीत धरणगाव शहरातील विविध प्रकारच्या समस्यांवर चर्चा झाली. यावेळी उपस्थित न. पा. गटनेते पप्पू भावे, उपनगराध्यक्षा अंजली विसावे, नगरसेवक वासुदेव चौधरी, सुरेश महाजन, भागवत चौधरी. अहमद पठाण, अजय चव्हाण, नगरसेविका सुरेखा महाजन, उज्वला पारेराव, कल्पना महाजन, आराधना पाटील, मंदा धनगर, कीर्ती मराठे, पर्वताबाई पाटील आदी उपस्थित होते.

Protected Content