मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या जळगावात

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या जळगावात येत असून ते प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या कन्येच्या विवाहाला उपस्थिती लावणार आहेत.

आमदार लताताई सोनवणे आणि माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांची सुकन्या चिसौकां अमृता यांचा विवाह उद्या दिनांक १० रोजी एकलव्य क्रीडा संकुलाच्या मैदानावर होत आहे. या विवाहाला राज्यातील अनेक मान्यवर नेत्यांची उपस्थिती राहणार आहे. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थिती लावणार आहेत. या संदर्भात जिल्हा प्रशासनाने त्यांचा दौरा जाहीर केला आहे.

या दौर्‍यानुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दुपारी चार वाजता विवाह सोहळ्याला भेट देणार आहेत. यानंतर ते जळगाव येथून लातूर येथे रवाना होणार आहेत. तर याच विवाह सोहळ्याला राज्य मंत्रीमंडळातील अनेक मंत्री देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

Protected Content