प्रभू श्रीरामचंद्र यांच्या प्राणप्रतिष्ठेच्या आमंत्रणसाठी आलेले मंगल अक्षदा पूजन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचशे वर्षाच्या संघर्षानंतर अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामचंद्र आपल्या जन्मस्थळी २२ जानेवारी रोजी विराजमान होणार आहेत. हा ऐतिहासिक सोहळा संपूर्ण देशभर साजरा केला जाणार आहे. या अनुषंगाने अयोध्येतून मंगल अक्षदा पूजा विधी करून जळगावमध्ये दाखल झालेले आहेत त्याच मंगल अक्षदांचे विधी विधानानुसार १०१ जोडपी यांच्या हस्ते अकरा कुंडी हवनयज्ञ मांडून पूजन संपन्न झाले आहे.

संपूर्ण जिल्हाभरामध्ये हे अक्षदांचे कलश वाटप केले गेले. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व तालुका प्रतिनिधी यांना मान्यवरांच्या हस्ते कलश सोपविण्यात आले आहे. यांच्या मार्फत या अक्षदांचे सोबतच घरोघरी श्रीराम यांची प्रतिमा देऊन कार्यक्रमासाठी आमंत्रण दिले जाणार आहे. रचनेनुसार शहरातील अकरा भागांचे प्रतिनिधी यांना मान्यवरांच्या हस्ते कलश सोपवण्यात आलेले आहे. शहरात व संपूर्ण जिल्हा भारत हे अक्षदा घरो घरी पोहचविण्यासाठी संपूर्ण रचना विश्व हिंदु परिषद मार्फत तयार केलेली आहे.

गायत्री परिवाराचे श्री भक्तीप्रसादजी मुंदडा व श्री हरिभाऊ व त्यांचे सहकारी यांनी संपूर्ण मंगल अक्षदांचे पौरोहित्य केले. २२ जानेवारी रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे भव्य दिव्य नियोजन करण्याचे तसेच घरोघरी हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा व्हावा, गल्लो गल्ली दारोदारी प्रत्येक मठ मंदिरामध्ये या उत्सवाचे फलक एलसीडी प्रोजेक्टर तसेच एक मोठ्या प्रमाणात दिवाळी सारखा हा उत्सव साजरा व्हावा यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन ललित चौधरी यांनी केले.

सदरील कार्यक्रमात जैन संघाचे अशोक जैन, आ. राजूमामा भोळे, केमिस्ट असोसिएशनचे सुनील भंगाळे, डॉ.वैभव पाटील व डॉ. केतकी पाटील, अनिल अडकमोल, रोहित निकम, तृतीयपंथी समाजाचे पुनमजान व त्यांचे सहकारी तसेच विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष हरीश मुंदडा, जिल्हा मंत्री देवेंद्र भावसार, जिल्हा सहमंत्री राजेंद्र गांगुर्डे, विभाग संयोजक राकेश लोहार, श्रीराम बारी, प्रसिध्दी प्रमुख भुषण क्षत्रिय, जिल्हा संयोजक अतुल पाटील, सहसंयोजक समाधान पाटील, महानगराचे मनोज बाविस्कर राजेश नन्नवरे किसन मेथे रमेश सपकाळे हरीश कोल्हे ललित खडके, यश पांडे, पवन झुंझाराव व शहरातील अनेक प्रतिनिधी व नागरिक उपस्थित होते.

Protected Content