वीज कर्मचारी, अधिकारी, अभियंते संयुक्त कृती समितीची विविध मागण्यांसाठी खामगाव येथे द्वार सभा

खामगाव, प्रतिनिधी | वीजकर्मचारी,अधिकारी,अभियंता संघर्ष समिती कडून प्रमुखमगण्याकरिता ऊर्जा मंत्री नितीन राऊत याना देण्यात आलेल्या नोटीसचां एक भाग म्हणून खामगाव विभागीय कार्यालय समोर आज संधयकाळी द्वार सभा घेण्यात आली.

 

या सभेला महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन कार्याध्यक्ष कॉ. सी. एन. देशमुख , झोनल सचिव कॉ. एन. वाय. देशमुख, सब ऑर्डीनेट इंजिनियर्स असोसीएशन विभागीय सचिव श्री. फेरंग, इंटक विभागीय सचिव अनिल गीते यांच्या प्रमुख उपस्थितीत होती. यामध्ये प्रमुख मागण्यामध्ये महावितरण कंपनीच्या विभाजनाचा निर्णय रद्द करणे. जलविद्युत प्रकल्प महानिर्मिती कंपनीच्याच ताब्यात ठेवणे. महाराष्ट्रातील “महाराष्ट्र औद्योगिक विकासमहामंडळाचे”फ्रॅन्चायजीचे धोरण रद्द करणे, तीनही कंपनी मधील सूत्रधारी कंपनीचा वाढता हस्तक्षेप तात्काळ बंद करावा. यासभेला खामगाव मधील वीज कर्मचारी अधिकारी अभियंते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कामगार एकजुटीचा विजय असोवीज कर्मचारी, अधिकारी, अभियंते संयुक्त कृती समितीचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या. याद्वारे सभेला वीज कर्मचारी, अधिकारी, अभियंते संयुक्त कृती समिती खामगाव विभाग चे सदस्य उपस्थित होते.

Protected Content