Home आरोग्य राज्यमंत्री बच्चू कडू यांना कोरोनाची बाधा

राज्यमंत्री बच्चू कडू यांना कोरोनाची बाधा

0
29


मुंबई । राज्यमंत्री बच्चू कडू यांना कोरोनाची बाधा झाली असून त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्यांनी चाचणी करून काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

राज्यमंत्री बच्चू कडू यांचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला असून त्यांनी आज स्वत: एका ट्विटच्या माध्यमातून याबाबतची माहिती जाहीर केली आहे. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. दरम्यान, कडू यांनी आपल्या संपर्कात आलेल्यांनी चाचणी करून घेत, काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

राज्य सरकारमधील अनेक मंत्र्यांना कोरोनाची बाधा होत असल्याचे दिसून आले आहे. कालच नितीन राऊत आणि हसन मुश्रीफ यांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला होता. या पाठोपाठ आता बच्चू कडू यांचा रिपोर्टही पॉझिटीव्ह आला आहे.


Protected Content

Play sound