Home Cities जळगाव स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्ताने आकाशवाणी चौकात मनसेतर्फे स्वच्छता मोहिम

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्ताने आकाशवाणी चौकात मनसेतर्फे स्वच्छता मोहिम

0
127

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरातील आकाशवाणी चौकात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने रविवारी १४ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्ताने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पुर्ण झाली आहे. या पार्श्वभूमीवर देशात स्वातंत्र्या अमृत महोत्सवाचे आयोजन करण्यात येवून विविध समजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने रविवारी १४ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता स्वच्छता मोहिम राबविण्यात आले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे, शहर उपाध्यक्ष आशिष सपकाळे, मनसे रस्ते आस्थापना जिल्हा संघटक राजेंद्र निकम, महेश माळी, योगेश पाटील, महेंद्र सपकाळे, राजू डोंगरे, संजय पाटील, प्रशांत बाविस्कर, दिपक राठोड, राहुल चव्हाण, राहुल दाभाडे, हरीओम सूर्यवंशी, खुशाल ठाकूर, निलेश वाणी, किरण सपकाळे, प्रणव चव्हाण, लोकेश वडनेरे, प्रशांत उमडकर, सुमित राठोड, लोकेश राजपूत, कुलदीप राजपुत, निखिल पाटील यांच्यासह मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.


Protected Content

Play sound